शिरूर च्या सराफ बाजारात गोळीबार, सोन्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे रात्री ०८:३० वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी सोन्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शिरूर येथील सुभाष चौक, सराफ बाजार येथील मे. जगन्नाथ धोंडीबा कोलथे सराफ यांच्या दुकानामध्ये घडली आहे. त्यांच्या दुकानामध्ये दोन अनोळखी इसमांनी सोन्या चांदीचे दागिने चोरी करण्याच्या उद्देशाने घुसखोरी केली. यावेळी दुकानातील कर्मचारी भिका एकनाथ पंडित आणि दुकानाचे मालक अशोक जगन्नाथ कोलथे यांनी त्यांना विरोध केला असता त्यापैकी पांढरे रंगाचा शर्ट घातलेल्या इसमाने त्याच्या जवळील बंदुकीची मागची लोखंडी बाजु पंडित यांच्या कोपराजवळ गळ्याजवळ व डोक्यात मारून जखमी केले. मात्र त्यानंतरही घुसखोरांना त्यांनी प्रतिकार केल्याने यातील त्यापैकी पांढरा रंगाचा शर्ट घातलेल्या आरोपीने कर्मचारी पंडित याच्या दिशेने बंदुकीतुन एक गोळी झाडून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच सराफ बाजारामध्ये दहशत पसरवुन त्यांच्या जवळील काळ्या रंगाच्या मोटर सायकलवर ते पसार झाले.

या घटनेमुळे शिरूर शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा पुढील तपास शिरूरचे पोसई पाटील हे करीत आहेत.