– सहकारनामा
दौंड : दौंड तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दौंड ग्रामिणमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
दि. 1/03/2021 रोजी यवत कोविड सेंटरमध्ये 128 जणांचे घशातील नमुने घेऊन ते प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचा आज दि.3 मार्च रोजी अहवाल आला असून 128 नामुन्यांपैकी 43 जनांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे तर निगेटिव्ह 85 जण निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशिकांत इरवाडकर यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 28 पुरुष आणि 15 महिलांचा समावेश आहे. तर पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. यवत -10, केडगाव -8, खुटबाव -8, खामगाव -3, पाटस – 4, राहू – 2, चौफुला – 1, वाळकी – 1, डुबेवाडी – 1, देऊळगांगाडा – 1, वरवंड – 2, पारगाव -1, कुरकुंभ -1, बोरीऐंदी – 1. हि गावनिहाय आकडेवारी असून पॉझिटिव्ह रुग्णांचे वयोमान हे 12 ते 70 वर्षे असे आहे.
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण राज्यात हाहाकार माजवला असून त्याने आता दौंड सारख्या तालुक्यांमध्येही आपला शिरकाव केला आहे. प्रशासकीय यंत्रणा आपल्या परीने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न करत असले तरी नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे बनले आहे.