– सहकारनामा
दौंड : (अख्तर काझी)
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण बाबतचे जिल्हाधिकारी यांच्या सुधारित आदेशानुसार पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत, नगरपालिका व छावणी परिषद हद्दीमध्ये दिनांक 3 एप्रिल पासून सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास (जमावबंदी) प्रतिबंध करण्यात येत आहे.
सदर आदेशाचा भंग करणाऱ्या प्रति व्यक्तीस 1000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. तसेच सायंकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत संचार बंदी ही लागू करण्यात आलेली आहे. मात्र यामधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे, वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरवणारे आस्थापना, व्यक्तींना कोविड लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात आले आहे.
नगरपालिका व ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट, व्यायाम शाळा, जलतरण तलाव दिनांक 3 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत संपूर्णपणे बंद राहणार आहेत तसेच आठवडे बाजार सुद्धा बंद असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.