– सहकारनामा
छत्तीसगड : छत्तीसगढमध्ये असणाऱ्या विजापूरच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर केलेल्या भीषण हल्ल्यात 22 जवान शहीद झाले आहेत. अगोदर 5 जवान शहीद झाले असल्याची व काही जवान बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. मात्र बेपत्ता जवानांचे मृतदेह एका जंगलात सापडल्यानंतर शहीद जवानांचा आकडा वाढून तो 22 झाला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर जवानांनीही 15 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
शनिवारी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये सुकमा आणि विजापूर सीमेवर असणाऱ्या तारेम जवळ चकमक उडाली होती. या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) जवान, जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दलाचे 2 हजारांच्या आसपास जवान होते. नक्षलवाद्यांनी अचानक या जवानांवर हल्ला चढवत चौफेर गोळीबार केला. नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला जवाणांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार सुरू केला.
On ground visuals from the site of Naxal attack at Sukma-Bijapur border in Chhattisgarh
ANI जवानांवर नक्षली हल्ला, 22 जवान शहीद
या चकमकीत सुरक्षा दलाचे अगोदर 5 जवान शहीद झाले असल्याची माहिती येत होती, तर 14 जवानांचा शोध लागत नव्हता. या सर्व घटनेनंतर सुरक्षा दलाकडून या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली त्यावेळी या बेपत्ता 14 जवानांचे मृतदेह जंगलात आढळून आले. त्यामुळे चकमकीत शहीद झालेल्या एकूण जवानांचा आकडा 22 वर पोहोचला तर 31 जवान जखमी झाले आहेत.