सांगली : काही दिवसांपूर्वी सांगली उपप्रादेशिक वाहन अधिकारी प्रशांत साळी यांच्या दालनामध्ये जाऊन मोबाईल मध्ये शूटिंग करत ‘तुमच्या केबिन मध्ये एजंट लोक थेट कसे येऊ शकतात? आणि थेट तुम्ही कमिशन घेता असा गंभीर आरोप करणाऱ्या व्यक्तीने केलेलं व्हिडिओ क्लिप प्रसारमाध्यमांमध्ये आणि सोशल मीडिया मध्ये व्हायरल झाली होती त्या व्यक्तीवर शासकीय कामात अडथळा, अधिकाऱ्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी संजयगांधी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
अधिक माहिती अशी, अंकुश केरिपाळे या व्यक्तीचे ‘आरटीओ’ कार्यालयाच्या आवारात दुकान आहे. दोन दिवसांपूर्वी अंकुश हे अधिकारी साळी यांच्या केबिन मध्ये गेले. तिथे मोबाईल मधून कॅमेरा सुरु करून शूटिंग सुरु केले यावेळी एकेरी भाषा वापरून येथे एजंट का आले आहेत सर्वसामान्य लोकांनां प्रवेश नाही मग एजंट लोकांना का प्रवेश देता कमिशन मिळते का ? असा सवाल केला. यावेळी व्हिडिओ चित्रण सुरु असताना अधिकारी साळी यांना धक्काबुक्की केली असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला असून सदर व्यक्तीने शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.झालेला वाद या कार्यालयातील लिपिक अमर मयेकर, संतोष मदने, श्रीनिवास घोडके, निरीक्षक गालिंदे, नागरिक रोहन पोटे, आदींनी मध्यस्ती करत मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र केरिपाळे यांनी अधिकारी साळी याना ओढत गेट कडे नेले तुला जिवंतच ठेवत नाही अशी धमकीही दिली. या सगळ्या प्रकारामुळे या कार्यालयाच्या आवारात एकच गोंधळ निर्माण झाला. या सर्व प्रकरणामुळे अंकुश केरिपाळे यांच्यावर शासकीय कामात अडथळे आणि धक्काबुक्की दमदाटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
व्हिडिओ चित्रीकरण व्हायरल
दोन दिवसांपूर्वी मुजोर अधिकारी आरटीओ अधिकारी साळी या मथळ्याखाली केरिपाळे यांनी केलेले व्हिडिओ चित्रण सोशल मीडिया वर चांगलेच व्हायरल झाले होते. या प्रकरणी संजयगांधी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.