पुणे : पुणे विद्यापीठ आणि इतर कॉलेजच्या पदवीच्या बनावट मार्कलिस्ट, सर्टिफिकेट तयार करून ती विकणारी टोळी जेरबंद करण्यात पुणे ग्रामिण गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.
पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्ह्यामध्ये गोपनीय माहिती काढून अवैधरित्या चालणाऱ्या कृतींवर कारवाई करण्याबाबत सूचित केले होते.
त्यानुसार सपोनि संदिप येळे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तसेच इतर कॉलेजेसच्या नावाने दिल्या जाणाऱ्या बनावट पदवीच्या मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट हे नीरा या ठिकाणी अवैधरित्या तयार करून ते लोकांना विकले जात असल्याची माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे विद्यापीठाचे स्टाफला या प्रकरणाची शहानिशा करण्यासाठी त्यांना घेऊन त्यांच्याद्वारे तपासणी करणे कामी नीरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेस येथे धाड टाकली असता तेथे बनावट प्रमाणपत्रे बनवली जात असल्याची त्यांची खात्री झाली. यावेळी पोलिसांनी बनावटी करणाचे साहित्य व बनावट प्रमाणपत्र जप्त करत त्या बाबत जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आरोपी १) गणेश संपत जावळे, (रा.नीरा) २) मनोज धुमाळ, (रा.नीरा) ३) वैभव लोणकर, (रा.बारामती) यांना अटक केली आहे. नमूद गुन्ह्याचा तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोसई गावडे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग श्री.मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहा पो निरीक्षक संदिप येळे, पो हवा रविराज कोकरे, पो.हवा अनिल काळे, पो.हवा सचिन घाडगे, पो.ना गुरू जाधव, पो.ना अभिजित एकशिंगे, पो.ना स्वप्नील अहिवळे, पो.ना अजय घुले,
पो.ना राजू मोमीन, पो.काँ प्रसन्ना घाडगे यांनी केली आहे.