दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड शहर आणि परिसरामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे.
उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 24/8/20 रोजी एकुण 97 जणांची rt-pcr तपासणी करण्यात आली त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून 97 पैकी एकूण 36 व्यक्तीचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले असल्याने दौंडकरांच्या चिंता वाढल्या आहेत. 97 पैकी 36 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 60 व्यक्तीचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 13 महिला आणि 23 पुरुषांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पाटस=1, ऋतु विहार=5, पद्मावती नगर=1, सरपंच वस्ती=1, गिरिम=4, शिवाजीचौक=2, एसआरपीएफ ग्रुप 5 = 3, एसआरपीएफ ग्रुप 7 = 2, दौंड कॉलेज=1, गोपाळ वाडी=2, देउळगाव.राजे=3, बोरावके नगर=1, मीरा सोसायटी=1, Ptc नानविज=1, पानसरे हॉस्पिटल=6, Sdh daund= 1 अशी गाव आणि वार्डवाईज आकडेवारी आहे. पॉझिटिव्ह रुग्णांचे वय हे 2 वर्षांपासून ते 78 वर्षांपर्यंत असल्याचे शेवटी दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी ‛सहकारनामा’ ला दिली.