Categories: Previos News

दौंड’मध्ये कोरोनाची स्थिती ‛कभी खुशी, कभी गम’. आज 93 पैकी शहरातील 4 तर ग्रामीण भागातील 3 रुग्णांचा समावेश



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी) 

शहर व  परिसरात कोरोना चा प्रसार कधी कमी तर कधी जास्त होताना दिसतो आहे. एखाद दिवशी परिस्थिती नियंत्रणात आली आहे असे वाटत असतानाच लागलीच दुसऱ्या  दिवशी बाधित रुग्णांची ची संख्या वाढल्याचा अहवाल समोर येतो अशी सध्या येथील परिस्थिती आहे. 

त्यामुळे येथील प्रशासनही  चक्रावून गेले आहे.दि.1 ऑक्टो. रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयाने शहर व परिसरातील 93 संशयितांची कोरोना तपासणी केली असता त्यापैकी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

मात्र यामध्ये शहरातील फक्त चौघांचा समावेश असून इतर तीन रुग्ण ग्रामीण भागातील असल्याचे स्पष्ट होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे तब्बल 87 जणांचा अहवाल निगेटिव आल्याने प्रशासनावरील  ताण थोडा कमी  झाला आहे.

16 ते 75 वर्ष वयोगटातील 6 महिला व  एका पुरुष रुग्णाला संसर्गाची बाधा झाली आहे. बाधित रुग्णांमध्ये पाटील चौक 2, गजानन सोसायटी 1, दत्तनगर, गोपाळवाडी1, राज्य राखीव पोलीस दल 1 तसेच काष्टी 2 या  परिसरातील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

43 सेकंद ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

1 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago