चिंताजनक :कोरोना’चा शहरावरील विळखा आणखीनच घट्ट..! शहर व परिसरातील 92 पैकी 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

दौंड शहरात वेगाने पसरणाऱ्या करोनाने आणखीनच वेग धरला असल्याचे चित्र दिसत आहे. ही बाब शहरासाठी अतिशय चिंताजनक आहे. करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या शहर व परिसरातील एकूण 92 जणांच्या घशातील स्त्राव पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी रविवारी पाठवण्यात आले होते त्यापैकी 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची ची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे उपाधिक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे. या महामारी च्या रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे शहराच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. आणि म्हणूनच या महामारी चा शहरातील प्रवास थांबविण्यासाठी प्रशासनाच्या  वतीने शहरात सोमवारपासून पूर्ण लॉक डाऊन लागू करण्यात आला आहे. महामारी संपविण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. लॉक डाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने ही आता कंबर कसली आहे. दौंड करांनी सुद्धा स्वतःसाठी नाहीतर कमीतकमी आपल्या घरातील बुजुर्ग मंडळींसाठी तसेच लहान मुलांसाठी तरी घरात बसावे विनाकारण घराबाहेर पडून प्रशासनासमोर अडचणी निर्माण करू नये अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. 

      प्रशासनाच्या कडक अंमलबजावणी नंतर शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने दिलेल्या वेळेत बंद  झाली. दौंडचे पो.नि. सुनील महाडीक यांनी स्वतः संपूर्ण शहरात गस्त घालीत लॉक डाऊन चा आढावा घेतला त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळाला.