दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच चालला असून पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सुमारे 45% टक्के इतके झाले असल्याने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्याकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
आज दौंड शहर आणि परिसरात एकूण 56 रुग्ण सापडले असून दौंड ग्रामिणमध्ये 33 रुग्ण सापडले आहेत. शहरात 132 पैकी 56 जण पॉझिटिव्ह आल्याने हे प्रमाण आता 45% टक्के इतके वाढले आहे.
आज दौंड शहरात गांधी चौक, जनता कॉलोनी, बंगला साईड, दत्तनगर, फादर हायस्कुल, एसआरपीएफ, सावंत नगर, मीरा सोसायटी, गजानन सोसायटी, शिवाजी चौक, स्प्रिंग होले अपा., तुकाईनगर, बोरावकेनगर, आणि ग्रामीण भाग असे 56 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.
तर दौंड ग्रामिणमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत असून…
आज यवत आणि स्वामी चिंचोली कोविड सेंटरमधून आलेल्या अहवालानुसार 33 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्वामी चिंचोली कोविड सेन्टरमध्ये 26 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती त्यामध्ये 13 जण पॉझिटिव्ह आढळून आले अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा पोळ यांनी दिली.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पेडगाव 4, कुरकुंभ 4, दौंड 1, आलेगाव 1, भिगवण 2 अशी गाव निहाय आकडेवारी असून यात 7 पुरूष आणि 6 महिलांचा समावेश आहे.
तर यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यवत ग्रामिण रुग्णालयातून दि.28 मार्च रोजी एकूण 83 जणांचे नमुने पाठविण्यात आले होते त्यापैकी 20 जण पॉझिटिव्ह आले आहेत तर 63 जण निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह मध्ये 11 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये यवत 10, खामगाव 2, पडवी 2, पाटस 1, बोरीऐंदी 1, देलवडी 1, पाटेठाण 1, भांडगाव 1, भरतगाव 1 अशी गाव निहाय आकडेवारी आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे वय हे 13 वर्षे ते 51 वर्षा दरम्यान आहे.