वाळू माफियांच्या 90 लाख रुपयांच्या यांत्रिक बोटी दौंड पोलिसांनी केल्या उध्वस्त, पोलीस उप अधीक्षक मयूर भुजबळ यांची धडक कारवाई



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

दौंड तालुक्यातील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या 90 लाख रुपये किमतीच्या यांत्रिक बोटी दौंड पोलिसांनी उध्वस्त केल्या. 

दि. 24 मार्च रोजी, तालुक्यातील शिरापूर व हिंगणी बेर्डी हद्दीतील भीमा नदी पात्रांमध्ये मध्ये वाळू माफिया अवैध वाळू उपसा करीत असल्याची माहिती मिळताच परिविक्षाधीन पो. उप.अधीक्षक मयूर भुजबळ स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी पोहोचले व त्यांनी अवैध वाळू उपसा करण्यासाठी लागणाऱ्या यांत्रिक बोटी ताब्यात घेतल्या, बोटी पोलीस स्टेशन ला आणणे शक्य नसल्याने त्यांनी दौंड महसूल विभागाच्या मदतीने त्या उध्वस्त केल्या आहेत. तालुक्यातील भीमा नदी पात्रातून प्रत्येक वाळू माफिया ला हद्दपार करणारच असा पवित्राच भुजबळ यांनी घेतल्याचे सध्या चित्र आहे. 

वाळूमाफियांनी आपला गोरख धंदा बंद करून नदीपात्रातून हद्दपार व्हावे असा इशाराच मयूर भुजबळ यांनी या धडक कारवाई द्वारे वाळू माफियांना दिला आहे. बाबू मोरे, किशोर( पूर्ण नाव माहित नाही), गोकर्ण खेडकर (रा. शिरापूर,दौंड)व इतर चौघांवर दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पो. उप. अधीक्षक मयूर भुजबळ, पोलीस निरीक्षक नारायण पवार पोलीस कर्मचारी किरण डुके, विशाल जावळे,वाय. एस. करचे, डी. वाय. ढोले या पथकाने कारवाई केली.