केडगावमध्ये कोरोनाच्या चढत्या आलेखाने चिंता वाढली, आज ‛या’ 9 गावांत 13 पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील केडगावमध्ये कोरोनाच्या चढत्या आलेखाने प्रशासनाच्या चिंतेत भर पडत चालली आहे.

काही दिवसांत केडगावमधील कोरोना रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत असून दि.23 मार्च रोजी यवत ग्रामिण रुग्णालयात 66 जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. त्यामध्ये 9 गावांतील 13 जण पॉझिटिव्ह आले असून एकट्या केडगावमध्ये आज 5 जण पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली.

गाव निहाय आलेल्या आकडेवारीनुसार केडगाव 5, भांडगाव 1, पिंपळगाव 1, राहू 1, पडवी 1, नांनगाव 1, बोरीभडक 1, यवत 1, आणि वासुंदे 1 अशी गाव निहाय आकडेवारी समोर आली आहे.

# केडगाव राहणार 3 दिवस बंद

केडगाव आणि परिसरामध्ये कोरोनाने  डोके वर काढल्यानंतर आता येथे काही कडक निर्बंध लावण्या व्यतिरिक्त ग्रामपंचायतीकडे पर्याय उरला नाही त्यामुळे येत्या 28 मार्चपासून रविवार, सोमवार आणि मंगळवार असे 3 दिवस संपूर्ण केडगाव बंद ठेवण्याचा निर्णय केडगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.

केडगाव बंद ठेवण्याबाबत केडगाव ग्रामपंचायतीचा निर्णय झाला असून येत्या 28, 29 आणि 30 मार्चला संपूर्ण केडगाव बंद राहील अशा आशयाचे पत्र केडगाव ग्रामपंचायतीने प्रसिद्ध केले आहे.