– सहकारनामा
मुंबई :
राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मिनी लॉकडाउन, जमावबंदी, संचारबंदी असे विविध निर्णय लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, किंवा ऑनलाइन क्लास ला उपस्थित राहून सिल्याबस समजून घेणे जिकिरीचे बनले होते.
या पार्श्वभूमीवर आता 9वी आणि 11वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जाणार असून त्यांची कुठलीही परीक्षा होणार नसल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले आहे. मात्र 10वी आणि 12वीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत.
या अगोदर 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले असल्याने नागरिकांना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे, यात विद्यार्थी वर्ग पुरता भरडून निघाला होता. अनेकांना ऑनलाइन अभ्यास करताना अडचणी येत होत्या.