दौंड : सहकारनामा ऑनलाइन
आज सोमवार दि.23/11/2020 पासून 9वी, 10वी च्या शाळा सुरू होत असून शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
दौंड तालुक्यातील केडगावमध्ये असणाऱ्या जवाहरलाल विद्यालयानेही आपल्या विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते बुधवार इ.10वी चे वर्ग सकाळी 11.30 ला तर गुरुवार ते शनिवार इ. 9वी चे वर्ग सकाळी 11:30 ला सुरू होतील अशी सूचना दिली आहे.
तसेच, विद्यार्थ्यांसाठी या शाळेने पुढील प्रमाणे नियम केले आहेत :-
1) शाळेत येताना प्रत्येक विद्यार्थ्याला आपला स्वतःचा स्वच्छ मास्क असावा.
2) विद्यार्थ्यांकडे छोटी सॅनिटायजरची बाटली असावी. त्याचा नियमित वापर करावा.
3) विद्यार्थ्यांनी शाळेत येताना, जाताना व शाळेत असताना सुरक्षित अंतराचे पालन करून, आपले रक्षण करावे व किमान 6 फुटाचे अंतर ठेवावे.
4) शाळेत येताना घरून जेवण करून यावे. कारण मध्ये कोणतीही सुट्टी होणार नाही. सलग 1ते 4 तास होतील.
5) स्वतःची पाणी बाटली बरोबर असावी. आपल्या कोणत्याही वस्तूंची आपसात देव-घेव करू नये. (वह्या, पुस्तके, व इतर वस्तू).
6) विद्यार्थ्यांनी प्रथमच शाळेत येताना पालकांच्या संमती पत्राची प्रिंट काढून, भरून आणावी.
7) स्वतः किंवा घरातील कोणी व्यक्ती आजारी असल्यास शाळेत येऊ नये, अथवा तशी माहिती शाळेला द्यावी अशा प्रकारचे नियम करण्यात आले आहेत. याबाबत जवाहरलाल विद्यालयाच्या प्राचार्यांनी हि नियमावली विद्यार्थ्यांसाठी केली असून यामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होणार आहे.