बारामती तालुक्यामध्ये 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, नराधम पोलिसांच्या जाळ्यात



बारामती – सहकारनामा

बारामती तालुक्यामध्ये अवघ्या 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 25 वर्षीय नराधमास अटक केली आहे.



हि भयानक घटना बारामतीच्या उंडवडी परिसरामध्ये घडली असून या प्रकरणी 25 पंचवीस वर्षीय नराधमास पोलिसांनी अटक करून त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या नराधम युवकाने या 9 वर्षाच्या मुलीला शेतात घेऊन जाऊन तिच्यावर बलात्कार केला होता. हि माहिती पीडित मुलीच्या आई वडिलांना समजताच त्यांनी थेट वडगाव

निंबाळकर पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत फिर्याद दिली होती.

बलात्काराची फिर्याद येताच वडगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, आणि त्यांच्या पथकाने आरोपीला जेरबंद करून त्यास बारामतीच्या न्यायालयात हजर केले असता त्यास 5 दिवसाची

पोलीस कोठडी देण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाय.

ए. शेलार करीत आहेत.