दौंड : सहकारनामा
दौंड तालुका सध्या कोरोना विषाणूमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. कारण दौंड तालुक्यात दररोज कोरोना रुग्ण सापडत असून हा आकडा आता वाढत चालला आहे. आज यवत आणि दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या आलेल्या अहवालानुसार 80 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
आज दि.30 मार्च रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालयात 130 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये 42 जण पॉझिटिव्ह आले तर 88 जण निगेटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये दौंड शहर 18 आणि दौंडच्या ग्रामिण परिसरामध्ये 24 असे एकूण 42 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्हमध्ये 23 पुरुष आणि 19 महिलांचा समावेश असल्याबाबतची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.
अशीच काहीशी परिस्थिती दौंड तालुक्यातील ग्रामिण भागातही असून आज यवत ग्रामिण रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालात 38 जण पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे तालुक्यात आज एकूण 80 जण पॉझिटिव्ह आले असून हा आकडा चिंता वाढवणारा आहे.
यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ इरवाडकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.29 मार्च रोजी 108 जणांचे घशातील नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते त्यापैकी 38 जण पॉझिटिव्ह आले तर 70 जनांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये यवत 12, केडगाव 4, खुटबाव 4, वरवंड 2, पडवी 1, उरुळीकांचन 1, कुसेगाव 1, भांडगाव 1, बोरीऐंदी 1, बोरिभडक 1, राहू 1, खामगाव 2, नानगाव 4, कासुर्डी 2, भरतगाव 1 असे 38 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 26 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश असून त्यांचे वयोमान हे 4 वर्षे ते 85 वर्षांच्या दरम्यान आहे.