दौंड : दीपगृह शाळेच्या संचालिका आश्लेषा मँडम यांच्या विनंतीवरून व भीमा पाटसचे विद्यमान संचालक विकास शेलार, तुकाराम ताकवणे यांच्या विशेष प्रयत्नामुळे दि.२१/०९/२०२१ रोजी दीपगृह शाळेमध्ये सुमारे ८० लोकांचे मोफत लसीकरण करण्यात आले.
यामध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी यांनाही लस देण्यात आली. हा शाळेचा समाजोपयगी उपक्रम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. समाजाच्या हितासाठी हि शाळा नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित आली आहे.
या कामी डाँ .डांगे, सुरेखा ताकवणे मॅडम, हुसेन सर, बढे सर यांचे मोठे सहकार्य लाभल्याचे या शाळेतील शिक्षकांनी सांगितले. या शाळेच्या वतीने अबिदा मिस व अँजेला मिस यांनीही विशेष परिश्रम घेतले.