Categories: क्राईम

ट्रान्सफॉर्मर चोरी करणाऱ्या टोळीकडून 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, केडगाव येथील 2 आरोपींचा समावेश

पुणे ग्रामीण : पुणे ग्रामीणच्या दौंड पोलीस ठाणे हद्दीत इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रमाण वाढले होते त्यामुळे चोरट्यांनी या भागाला लक्ष करत डोके वर काढल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक अभिवन देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मिलिद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राहुल धस व पोलीस निरीक्षक श्री.विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाणे हद्दीत होणाऱ्या ईलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करून ते उघडकीस आणणे करीता दौड गुन्हे अन्वेषण (डी.बी) पथक प्रमुख शहाजी गोसावी व त्यांची टीम तपास करीत असताना दौंड डी.बी पथकाचे हाती काही पुरावे मिळून आले, त्या पुराव्यांचे आधारे डी.बी पथकाने सखोल तपास करत पाच संशयित आरोपी चेतन पिंपळे रा.तळेगाव ढमढेरे, (ता.शिरूर,) मयूर उर्फ बाब्या काळे (रा.तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर) विनय भोसले (रा.केडगाव, ता.दौंड,) संतोष भोसले (रा.केडगाव, ता.दौंड,) अजय सुरडकर (रा.तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर) यांना अटक केली होती.

सदर आरोपींना मा.कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केलेने पोलीस कस्टडी दरम्यान चौकशी मध्ये त्यांनी दौंड पोलीस ठाणे हद्दीतील ईलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर मधील चोरीला गेलेल्या सर्व कॉपर वायरच्या गुन्ह्यांची कबुली दिली व सदर आरोपींच्या ताब्यातून आत्तापर्यंत चोरी केलेला माल व एक पीकअप वाहन असे मिळून एकूण 8 लाख 20
हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा.डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण,
अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पो अधिकारी राहुल धस व पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राठोड, डी.बी पथकाचे पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी, स.फौ. भाकरे, पो.हवा सुभाष राऊत, पो.ना अमोल गवळी, पो.ना, आदेश राऊत, पो.ना. विशाल जावळे, पो.ना रणजित निकम, पो.ना हुके, पो काँ अमोल देवकाते यांनी केली असून अधिक तपास स.फौ. कुंभार करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

34 मि. ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago