धक्कादायक -महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील 8 जण कोरोना पॉझिटिव्ह



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असून या सर्वांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती समोर येत आहे. मुरलीधर मोहोळ यांचे निवासस्थान पुण्यातील कोथरूड परिसरात असून ते कोरोनाच्या काळातही युद्ध पातळीवर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत होते. त्यांनी पुण्यात वाढत असलेला कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी मोठी मेहनत घेत होते त्यातच त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्यांनी स्वतः होऊन कोरोना टेस्ट करवून घेतली होती. यामध्ये त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्याही कोरोना चाचण्या घेण्यात आल्यानंतर हा धक्कादायक रिपोर्ट समोर  येत मोहोळ यांच्या कुटुंबातील एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.