पांढरेवाडी-जिरेगाव शिवेवर शेतकऱ्यांचा 8 हेक्टर चारा जळून खाक



कुरकुंभ : सहकारनामा(आलिम सय्यद)

पांढरेवाडी-जिरेगाव शिवेवरती शेतकऱ्यांचा सुमारे 7 ते 8 हेक्टर जनावरांचा चारा  जळून  खाक झाल्याची घटना घडली आहे.

पांढरेवाडी-जिरेगाव शिव वरती शितोळेवस्ती जवळ मंगळवार दि.१९  दुपारी तीनच्या सुमारास डोंगरावर असलेल्या शेतातील सात ते आठ हेक्टर सुकलेला चाऱ्याला अचानक भीषण आग लागून येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती येथील शेतकऱ्यांनी सांगितली आहे. 

ही आग तब्बल तीन ते चार तास चालू होती. विजेच्या खांबावरुन आगीची ठिंगणी पडून हि आग लागली असावी असा अंदाज येथील शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

लागलेली आग आटोक्यात येत नसल्याचे पाहून येथील शेतकऱ्यांनी कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील अग्निशमन दलाला संपर्क साधला साधल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत येथील शेतकऱ्यांच्या सोबत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने हि आग आटोक्यात आणण्यात यश आले.

अग्निशमन दलाचे अधिकारी सुधीर खांडेकर व त्यांच्या जवानांनी व येथील शेतकऱ्यांनी येथे शर्तीचे प्रयत्न करून ही आटोक्यात आणली. ज्या ठिकाणी आग लागली होती तो भाग पूर्णपणे डोंगरराळ असूनही त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अडचणींचा सामना करत वाहने घटनास्थळी घेऊन जात ती आग विझवून आपले कर्तव्य पार पाडले आहे.

अग्निशमन दलाचे हे काम पाहून येथील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले.