Categories: Previos News

शिरूरमध्ये भर रस्त्यावर पाठलाग करून 8 गोळ्या झाडून खून करणारे 2 आरोपी LCB च्या ताब्यात



पुणे : सहकारनामा

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे रस्त्यावर पाठलाग करून एकाचा 8 गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. हि घटना सोमवार दिनांक १८ जानेवारी २०२१ रोजी दुपारी १२.०० वा. घडली होती.

स्वप्नील छगन रणसिंग (वय २४ रा.टाकळी हाजी ता.शिरूर जि.पुणे) 

असे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव होते. या खून प्रकरणी Lcb ने आरोपी १) विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे २) आकाश उर्फ बबलु खंडु माशेरे दोघे (रा.आमदाबाद ता.शिरुर जि.पुणे) यांच्या मुसक्या आवळल्या असून आरोपींनी संगनमत करून होंडा शाईन मोटार सायकलवर येत स्वप्नील रणसिंग याचा पिस्तुलमधून गोळया झाडुन खुन केला होता. तसेच त्याच्या सोबत असलेला त्याचा मित्र स्वप्नील सुभाष गावडे यास गोळी मारून जखमी केले होते. याबाबत मयत स्वप्नील छगन रणसिंग (वय २४) याच्या पत्नीने शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून आरोपींवर खुनाचा  गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर गुन्हा हा पुणे जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीच्या दिवशी व वाळू माफियांच्या वादातून झालेला होता. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन तपासाबाबत शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांना आरोपींबाबत सूचना दिल्या होत्या. 

गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी गुन्ह्याचा समांतर तपास करणेसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमणे बाबत पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना आदेश दिले होते. त्याप्रमाणे तपासासाठी शिरूर पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके नेमण्यात आली होती.

गुन्हे शाखेचे पथकाने घटनास्थळी भेट देवून गुन्ह्याची माहिती घेऊन तपासाला सुरुवात केली होती. त्याप्रमाणे  आजूबाजूचे गावातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून आरोपीचा जाणेयेण्याचा मार्ग याबाबत स्थानिक गावकऱ्यांकडे सुद्धा चौकशी केली होती. त्यातूनच गुन्हे शाखेचे पथकाला गोपनीय माहिती हाती लागून आरोपी १) विजय उर्फ पप्पू उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे (वय २५ वर्षे रा.आमदाबाद ता.शिरुर जि.पुणे)  २) आकाश उर्फ बबलू खंडु माशेरे (वय २४ वर्षे रा.आमदाबाद, ता.शिरूर, जि.पुणे) यांना मौजे शिक्रापूर पुणे-नगर हायवे रोड वरील शिक्रापूर-चाकण चौक येथे साध्या वेशात सापळा रचून ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

सदर दोन्ही आरोपी पुढील अधिक तपासकामी शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहेत. यातील आरोपी विजय उर्फ कोयत्या शेंडगे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी शिरूर व शिक्रापूर पोलीस स्टेशनला मारामारी, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपींचे आणखीन कोणी साथीदार आहेत काय? याबाबतचा अधिक तपास आरोपींची कोर्टाकडून पोलिस कस्टडी रिमांड घेऊन शिरूर पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती अपर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते, दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, दत्तात्रय गिरमकर, राजेंद्र थोरात, शब्बीर पठाण, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, विद्याधर निचित, जनार्दन शेळके, राजू मोमीन, मंगेश थिगळे, अक्षय नवले, काशिनाथ राजापुरे, प्रमोद नवले, अक्षय जावळे यांनी केलेली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago