दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील खोर या गावामध्ये निवडणुकीच्या आणि जमिनीच्या जुन्या कारणावरून एका कुटुंबास लोखंडी पहार आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी फिर्यादीवरून यवत पोलिसांनी आठ जनांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी बबन तात्याबा डोंबे (रा.डोंबवस्ती, खोर ता.दौंड) यांनी फिर्याद दिली की १) गोरख बाळासाहेब डोंबे २) सुशांत जनार्धन
डोंबे ३) नवनाथ बाळासाहेब डोंबे ४) जनार्धन बबन डोंबे ५) गणेश ज्ञानेश्वर
डोंबे ६) अमोल शांताराम डोंबे ७) अविनाश शांताराम डोंबे ८) शांताराम जगनाथ डोंबे या आरोपींनी ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये पराभुत झाल्याने तसेच पुर्वीच्या जमीनीच्या भाडणाचे कारणावरून चिडुन जावुन आरोपी व इतर ३ अनोळखी इसम नाव पत्ता माहित नाही यांनी गर्दी जमाव जमवून सियाझ कार मधुन पहार काढुन त्या लोखंडी पहारेने फिर्यादीचे डावे पायास गुडघ्याचे खाली मारले त्यावेळी फिर्यादी खाली पडले असता गाडीतील आरोपी व इतर अनोळखी इसमांनी हाताने व लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली.
तसेच आरोपी याने त्याचे हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीची पत्नी सुनंदा हिचे डावे हातावर मारहाण केली त्यावेळी मुलगा ज्ञानेश्वर हा शेतातुन मोटार सायकलवरून येत असताना आरोपी याने मुलगा ज्ञानेश्वर यास थांबवुन तुझे मुळे माझी बायको ग्रामपंचायत मध्ये पडली म्हणुन हातातील लोखंडी रॉडने डोक्यात मारून दुखापत केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
याबाबत यवत पोलिस ठाण्यात आठ जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढीप तपास यवत पोलीस करीत आहेत.