आज 8 गावांतील 14 जण कोरोना पॉझिटिव्ह, केडगाव, यवतमध्ये बाधितांचे प्रमाण वाढले



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यामध्ये कोरोनाने आपले जाळे पुन्हा एकदा पसरवण्यास सुरुवात केली आहे. सध्या तालुक्यात अनेक गावांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत.

आज दि.8 मार्च रोजी आलेल्या अहवालामध्ये 8 गावांतील 14 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती तालुका आरोग्यधिकारी पोळ मॅडम यांच्याकडून  मिळत आहे.

दौंड तालुक्यात मोठ्या गावांना कोरोनाने टार्गेट केले असून यामध्ये केडगाव आणि यवत हि दोन मोठी गावे आघाडीवर आहेत.

आज आलेल्या अहवालामध्ये केडगाव 4, यवत 4, बोरीपार्धी 1, देलवडी 1, भरतगाव 1, खोर 1, बोरीऐंदी 1, कुरकुंभ 1 असे 8 गावांतील तब्बल 14 जण कोरोना बाधित आढळले आहेत.