केडगाव, पाटस, खोरसह ‛या’ 8 गावांतील 10 जणांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. विविध गावांमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव होत असूनही नागरिक मात्र बिनधास्त नियम मोडून वागत असल्याचे चित्र आहे.

नागरिकांनी मास्क परिधान करावे यासाठी पोलीस प्रशासनाकडून जागोजागी चेकिंग केली जात आहे, मात्र पोलीस दिसले की मास्क घालायचा आणि पुढे गेले की पुन्हा मास्क खिशात अशी काहीशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे त्यामुळे कोरोनाचा प्रसार हा पुन्हा झपाट्याने होण्यास मदत मिळत आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दौंड तालुक्यात एकूण 81 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून यामध्ये 59 ग्रामिण तर 22 जण शहरी भागातील आहेत.

आलेल्या अहवालानुसार काल 10 जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये केडगाव 2, खोर 2, गलांडवाडी 1, पाटस 1, गोपाळवाडी 1, भरतगाव 1, कासुर्डी 1, कानगाव 1 असे 10 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

नागरिकांनी मास्क परिधान करावे, सॅनिटायजर, साबणाचा वापर करावा, गर्दी टाळावी आणि कोरोना सदृश कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित रुग्णालयांशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.पोळ मॅडम यांनी केले आहे.