पुणे-सोलापूर हायवेवर कंटेनर भरून गुटखा पकडला, 76 लाखांचा मुद्देमाल जप्त



इंदापूर – सहकारनामा ऑनलाईन

परराज्यातून पुणे शहर तसेच ग्रामीण भागातील गल्ली बोळातील टपरीवर विक्रीसाठी येणारा गुटखा सोलापूर -पुणे हायवेवर पकडण्यात आला आहे. कंटनेर भरुन येणारा गुटखा भिगवण पोलिसांनी शिताफीने पकडल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातून कंटेनरमधून येणारा हा गुटखा भिगवण पोलीसांनी भादलवाडी  येथे शिताफीने पकडला यावेळी ७६ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

या प्रकरणी भिगवण पोलीसांनी चार आरोपींसह गुटखा उत्पादक कंपनी विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये वाहन चालक करमहुसेन हसनरजा चौधरी ( वय.३३ रा.मुडीला, उत्तर प्रदेश), शहजाद खान, शादाब तुफेल खान दोघेही राहणारे कोंढवा कोढवा तर माल पुरवणारा अनोळखी पुरवठादारासह गुटखा उत्पादक एच.आय. तांबोळी अँड सन्स ( यरनाळ ता. चिकोडी जि. बेळगाव, कर्नाटक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर  वाहन चालक करमहुसेन चौधरी यास अटक करण्यात आली आहे.

हि कारवाई आज गुरुवारी  दुपारी पोलीस नाईक इन्कलाब पठाण हे पुणे-सोलापूर हायवेवर पेट्रोलिंग करीत असताना भादलवाडी येथे एक कंटेनर क्र., KA.22 D 2274  हा सोलापूर दिशेकडून पुण्याकडे जात असताना पोलीसांना या कंटेनरचा संशय  आला. यावेळी पोलिसांनी कंटेनरचा पाठलाग करून त्यास पकडून चौकशी केली त्यावेळी साडे पंचेचाळीस लाखाचा गुटखा तसेच पावणे अकरा लाख रुपयांचा रॉयल पान मसाला आढळुन आला.

यावेळी पोलिसांनी सुमारे 56 लाख 25 हजारांचा गुटखा व 20 लाख रुपयांचा कंटेनर असा एकुण 76 लाख 25 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस उपनिरीक्षक रियाज शेख, पोलिस नाईक इन्कलाब पठाण व भिगवण पोलिसांनी केली आहे.