तुम्ही आनंदाचा शिधा घेतला का | पुणे जिल्ह्यातील 73 टक्के कुटुंबांना शिधा पोहोचला, पहा कोणत्या तालुक्यात किती वाटप

पुणे : शासनाच्या पुरवठा विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थींच्या पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी-गणपती निमित्त चार शिधा वस्तू असलेला आनंदाचा शिधा ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वितरीत करण्यात येत आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात 20 सप्टेंबर अखेर ७३ टक्के आनंदाचा शिधाचे वितरण करण्यात आले आहे.

प्रती शिधापत्रिका (कुटुंब) १ असा शिधा वाटप करण्यात येत आहे. ज्यामध्ये १ किलो रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर पामतेल असे एकूण ४ वस्तू असलेला १ संच १०० रूपये या दराने रास्तभाव दूकानातून वितरीत करण्यात येत आहे.

पहा दि. 20 सप्टेंबर अखेर पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती कुटुंबांना मिळाला आनंदाचा शिधा

आंबेगाव तालुका – ४४ हजार १०० लाभार्थ्यांपैकी ३० हजार ८९० कुटुंबांना

बारामती तालुका – ८३ हजार ९५० लाभार्थ्यांपैकी ४९ हजार ३१९,

भोर तालुका – २६ हजार ८०० लाभार्थ्यांपैकी २१ हजार ५७४,

दौंड तालुका – ५२ हजार १०० लाभार्थ्यांपैकी ३३ हजार ३४,

हवेली तालुका – २१ हजार ९५० लाभार्थ्यांपैकी १८ हजार ९५६,

इंदापूर तालुका – ६७ हजार १४५ लाभार्थ्यांपैकी ४२ हजार ३५१,

सहकारनामा

जुन्नर तालुका – ६३ हजार ७०० लाभार्थ्यांपैकी ५४ हजार ४१८,

खेड तालुका – ५७ हजार ३५० लाभार्थ्यांपैकी ५१ हजार ३२५,

मावळ तालुका – ३६ हजार ८५० लाभार्थ्यांपैकी २९ हजार २४९,

मुळशी तालुका – १७ हजार ९५० लाभार्थ्यांपैकी १४ हजार ६३३,

पुरंदर तालुका – ३७ हजार २०० लाभार्थ्यांपैकी २८ हजार ३६७,

शिरूर तालुका – ४६ हजार १५० लाभार्थ्यांपैकी ३० हजार ५२३,

तर वेल्हे तालुक्यात ७ हजार ५५० लाभार्थ्यांपैकी ६ हजार ८३० लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला आहे.

उर्वरित लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. वितरणाबाबत कोणतीही तक्रार असल्यास नजीकच्या तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेखी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी केले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

9 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago