दौंड : सहकारनामा ऑनलाइन
फिर्यादी नामे दशरथ वाल्मीक जेधे, वय.४२ वर्षे, धंदा. हॉटेल, रा. तळेगाव ढमढेरे, ता.शिरूर, जि.पुणे. हे सुमारे ३ वर्षापासुन पुणे सोलापुर हायवे रोडवरील मौजे बोरीभडक, चंदनवाडी गावातील जॉली हॉटेल चालवित असुन त्यांच्या हॉटेलवर मॅनेजर म्हणुन प्रताप नावाचा व्यक्ती काम करत होता.
दि.१६/०६/२०१९ रोजी रात्री ११:००
वा.चे सुमारास यातील फिर्यादी यांनी काऊंटरमध्ये व्यवसायाचे रोख ७३ हजार रूपये ठेवुन ते फ्रेश होण्यासाठी
बाजुला गेले होते. ते काही वेळाने परत आले तेव्हा त्यांना हॉटेलचे काऊंटरवर मॅनेजर प्रताप दिसला नाही म्हणुन
त्यांना संशय आला व त्यांनी काऊंटरमध्ये ठेवलेले रोख ७३,०००/- रूपये पाहिले असता पैसे मिळुन आले नाही.
सदर पैसे मॅनेजर प्रताप यानेच चोरून नेले बाबत त्यांची खात्री झाली असता त्यांनी मॅनेजर प्रताप याचा पुणे परीसरात सर्व हॉटेलवर शोध घेतला परंतु तो सापडला नाही म्हणुन मॅनेजर प्रताप यानेच रोख ७३,०००/- रूपये चोरी करून नेले बाबत यवत पोलीस स्टेशन येथे दि.२२/०६/२०२० रोजी गु.र.नं. ५६०/२०१९ भा.दं.वि.क. ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पो.ना.गणेश पोटे यांचेकडे आला, त्यानंतर या गुन्ह्याचा तपास करताना सदर गुन्ह्यातील आरोपी याचे फक्त प्रताप एवढेच नाव माहित होते, त्याचे पुर्ण नाव व पत्ता माहित नव्हते. त्यामुळे या गुन्ह्यातील साक्षीदार यांचेकड़े तसेच तांत्रिक तपास करुन वरील आरोपी हा मध्यप्रदेश राज्यातील असुन त्याचे नाव प्रताप नारायण माझी असल्याचे समजले.
तसेच तो चोरी केल्यानंतर लगेच त्याचे मुळ गावी जिल्हा. रिवा, मध्यप्रदेश येथे पळुन गेला असल्याची माहिती मिळाली. सुमारे दिड वर्षानंतर दि.०५/११/२०२० रोजी गुन्ह्यातील संशईत आरोपी हा भोर तालुक्यातील पसुरेगांव येथे कुंजवन रिसॉर्ट येथे काही दिवसांपासुन मॅनेजर म्हणुन काम करीत आहे अशी गोपनिय माहिती
पो.ना.पोटे यांना मिळाली. त्याप्रमाणे पो.ना.पोटे यांनी बातमी मिळताच कुंजवन रिसॉर्ट, पसुरेगांव, ता.भोर, जि.पुणे येथे जावुन त्याचा शोध घेवुन त्यास आज ताब्यात घेतले.
या आरोपीचे नाव प्रताप नारायण दुधराज माझी, (वय.२८ वर्षे, धंदा. हॉटेल कामगार, सध्या रा कुंजवन रिसॉर्ट, पसुरे गांव, ता.भोर, जि.पुणे. मुळ रा.कसीयारी, पोस्ट.कोनी, तहसिल जवा, जि.रिवा, मध्य प्रदेश) असे असून वरील आरोपीस गुन्ह्यात अटक करून मा. दौंड न्यायालय समोर हजर केले असता तपासकामी त्याची
४ दिवस पोलीस कोठडी मिळाली असुन त्याने चोरलेल्या रकमेपैकी रोख रक्कम ७,६००/- रूपये त्याचेकडुन जप्त करण्यात आलेले असून अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक , अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलींद माहिते, उप.विभागिय पोलीस अधीकारी, राहुल धस व मा.पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील
यवत पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश पोटे, सुभाष शिंदे, विनोद चोबे यांचे पथकाने केली आहे.