Health | ‛आ.कुल’ यांच्या निधीतून महिलेवर 7 लाखांची शस्त्रक्रिया ‛मोफत’

राहुल अवचर

देऊळगावराजे : देऊळगावराजे येथील एका महिलेची आमदार राहुल कुल यांच्या निधीतून सात लाख रुपयांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे दौंड तालुका अध्यक्ष अभिमन्यू गिरमकर यांनी दिली.

येथील सिंधुबाई महादेव कोल्हे यांना अनेक दिवसांपासून गुडघे दुखीचा त्रास होता. अनेक गोळ्या व औषध घेतल्यानंतरही गुडघेदुखीचा त्रास हा कमी होत नसल्यामुळे खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांनी त्यांना गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले. मात्र त्या शस्त्रक्रियेचा खर्चही मोठा असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी गिरमकर यांच्याशी संपर्क करून शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली.

गिरमकर यांनी याची कल्पना आमदार राहुल कुल यांना कल्पना दिली व या शस्त्रक्रियेबाबत आ.कुल यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून आमदार निधीतून त्या महिलेची मुंबई येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये सात लाख रुपयांची गुडघ्यावरची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर सिंधुबाई यांना गुडघेदुखीतून आराम मिळाला असून त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.