दौंड शहरामध्ये 7 जणांना कोरोनाची बाधा



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर लोकांनी कोरोनाची भीती न बाळगता बिनधास्त पणे वागणे सुरु केले, घरांपासून बाजारपेठेत गर्दी केली, सुरक्षित वावराच्या नियमांचा फज्जा उडविला त्यामुळे शहरात कोरोनाची दुसरी लाट येते की काय अशी परिस्थिती समोर येऊ लागली आहे. 

याचे कारण म्हणजे खूप दिवसाच्या अंतराने आज शहरात पुन्हा 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दौंडकरांनी वेळीच सावध होत या महामारीपासून बचावासाठी प्रशासनाने दिलेल्या उपाय योजनांची पूर्वी सारखीच अंमलबजावणी सुरू करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दि.24नोव्हेंबर रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयाने शहर व परिसरातील 40 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी केली असता 7 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 16 ते 59वर्ष वयोगटातील 3 महिला व 4 पुरुष रुग्णांना संसर्गाची लागण झाली आहे. 

शहरातील 2, ग्रामीण भागातील 4 तर एका राज्य राखीव पोलीस जवानाचा रुग्णांमध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.