आत्ताच्या ताज्या अहवालात केडगाव 7 तर बोरीपार्धी 2 ने कोरोना रुग्णांची भर, 8 गावांत 24 जण पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्याला कोरोनाने आपले रौद्ररूप दाखविण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागात दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख हा वाढतच असंलेला दिसत आहे. 

यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरवाडकर यांच्याकडून प्राप्त झालेल्या ताज्या  अहवालानुसार एकूण 110 जणांची चाचणी करण्यात आली होती त्या पैकी 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

24 तारखेला 110 लोकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी आत्ता सर्वच 110 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून या अहवालामध्ये केडगाव 7,  बोरीपार्धी 2, यवत 1,  डाळिंब 5, चंदनवाडी 4, कडेठाण 2, पाटस 2, वाळकी 1 अशी गाव निहाय आकडेवारी समोर आली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 6 वर्षीय चिमुकल्यांपासून ते 67 वर्षणपर्यंतच्या वृद्धाचाही समावेश असून यामध्ये 13 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश असल्याची माहिती डॉ.इरवाडकर यांनी दिली.