Categories: Previos News

हडपसर पोलीसांची मोठी कारवाई, अट्टल चोरट्यांकडून 7 लाखाच्या 14 दुचाकी जप्त



पुणे : सहकारनामा

हडपसर पोलिसांनी दुचाकी गाड्या चोरणाऱ्या रेकॉर्डवरील अट्टल अतुल चोरटयांना पकडून त्यांच्याकडून सुमारे 7 लाख रुपये किंमतीच्या 14 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

पुणे शहरातील वाहन चोरी, जबरी चोरी व घरफोडी अशा घटना उघडकीस आणण्याच्या  दृष्टीने दि.०५/०३/२०२१ रोजी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका मोटर सायकलवरून तीन मुले जोरात पुण्याच्या दिशेने जात असल्याचे दुसले यावेळी या पथकाने  त्या मोटर सायकलचा पाठलाग करुन त्यावरील युवकांना पकडुन ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे शुभम संजय धुमाळ (वय २१ रा. धुमाळमळा माजमाता थेऊर फाटा, लोणीकाळभोर ता.हवेली जि.पुणे.) स्वप्नील विलास उकरंडे (कपिल हाईटस, पापडे वस्ती फुरसुंगी, हडपसर) ३) मंजुनाथ नागेश माने (वय २२, रा.गल्ली नंबर-२, विदयाविहार कॉलनी, डी.पी. रोड माळवाडी हडपसर पुणे) असे असल्याचे सांगितले.

यावेळी पोलिसांनी या युवकांना त्यांच्या ताब्यात असलेल्या बिगर नंबर हिरो होन्डा स्प्लेन्डर मोटर सायकल गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांना मोटर सायकलसह वरिल स्टाफचे मदतीने हडपसर पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेकडे सदर मोटर सायकलीबाबत तपास केला असता सदरची मोटर सायकल त्यांनी त्याचे साथीदारासह फुरसुंगी गावठाण हडपसर पुणे, याठिकाणाहुन चोरी केल्याचे सांगितले. 

हिरो होन्डा स्प्लेन्डर मोटर सायकल याचे चॅसी व इंजिन नंबरवरुन हडपसर पोलीस स्टेशनकडील क्राईम रजिस्टरची पडताळणी केली असता सदरची मोटर सायकलचा  आर.टी.ओ. नंबर- एम.एच. १२ जी.एक्स. ४८०५ असा असुन त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर- १९५/२०२५ भा.द.वि.कलम- ३७२ या गुन्हयात चोरली असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे वरील युवकांना  वरील नमुद गुन्हयात दिनांक ०५/०३/२०२१ रोजी १६.६ वाजता अटक करण्यात आली.

अटक आरोपी नामे शुभम संजय धुमाळ, स्वप्नील विलास उकरंडे, मंजुनाथ नागेश माने तसेच आदित्य ऊर्फ दादया बबन शिंदे

(वय २३ रा.माळवाडी हडपसर पुणे) यांचेकडे सचोटीने व कौशल्यपुर्वक तपास केला असता या आरोपींनी वाहन चोरीचे गुन्हे केले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्याकडून 7 लाख रुपयांच्या एकूण 14 वेगवेगळया कंपनीच्या मोटार सायकली गाडया जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील अट्टल चोरटे असून हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा.श्री.नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग पुणे) व मा.नम्रता पाटील पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ५ पुणे शहर) यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा.श्री. कल्याणराव विधाते (सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे) श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर, पोनि (गुन्हे) श्री. राजु अडागळे,पोनी (गुन्हे) श्री.दिगंबर शिंदे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, नितीन मुंढे ,अकबर शेख, शाहीद शेख, सचिन जाधव, शशिकांत नाळे, समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अविनाश गोसावी, सैदोबा भोजराव, संदिप राठोड, प्रशांत टोणपे यांच्या  पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

14 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

15 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

16 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

24 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago