– सहकारनामा
दौंड :
दौंड तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तालुक्यातील ग्रामिण भागात अक्षरशा कोरोनाचा विस्फोट झाला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दि.16 एप्रिल रोजी आलेल्या अहवालामध्ये तालुक्यातील जनतेची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली असून एकाच दिवसात 32 गावांतील सुमारे 225 जण कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सर्वात जास्त रुग्ण हे कासुर्डी येथे सापडले असून त्यांची संख्या 69 इतकी आहे. तर त्या खालोखाल यवत 24, केडगाव 17, वरवंड 13, पाटस 16, गोपाळवाडी 10 अशी जास्त रुग्ण संख्या आढळलेल्या गावांची यादी असून कोणत्या गावात किती रुग्ण याबाबतची आकडेवारी खालील पैकी आहे.