Categories: Previos News

सुपे-मोरगाव रोडवर टँकर मधून स्पिरिट चोरी करणाऱ्यास रंगेहात पकडले, 62 लाखांचा मुद्देमाल जप्त



बारामती : सहकारनामा ऑनलाईन

बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी नजीक सुपे-मोरगाव रस्त्यावर टँकरमधून स्पिरिट चोरी करून त्याची विक्री करणाऱ्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रंगेहात पकडत सुमारे 62 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार  सुपे-मोरगाव रोडवर भोंडवेवाडी गावाच्या हद्दीमध्ये एक राजस्थानी ढाबा ज्याचे नाव रंगीला राजस्थान असे असून त्याच्या आवारामध्ये हा भयंकर प्रकार सुरू होता. सोळा चाकी टँकरने हे स्पिरीट दुसऱ्या राज्यात जात असताना हे स्पिरिट घेऊन जाणारा ट्रक चालक सुखनाम सिंग हा राजस्थानी ढाबा चालवणाऱ्या पुखराज भार्गवला हे चोरीचे स्पिरीट विकत असे. हा ढाबा चालक हे स्पिरिट  दारू आणि हातभट्टी वाल्यांना विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हि कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे आणि विभागीय भरारी उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी केली.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

17 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago