बारामती : सहकारनामा ऑनलाईन
बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी नजीक सुपे-मोरगाव रस्त्यावर टँकरमधून स्पिरिट चोरी करून त्याची विक्री करणाऱ्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने रंगेहात पकडत सुमारे 62 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सुपे-मोरगाव रोडवर भोंडवेवाडी गावाच्या हद्दीमध्ये एक राजस्थानी ढाबा ज्याचे नाव रंगीला राजस्थान असे असून त्याच्या आवारामध्ये हा भयंकर प्रकार सुरू होता. सोळा चाकी टँकरने हे स्पिरीट दुसऱ्या राज्यात जात असताना हे स्पिरिट घेऊन जाणारा ट्रक चालक सुखनाम सिंग हा राजस्थानी ढाबा चालवणाऱ्या पुखराज भार्गवला हे चोरीचे स्पिरीट विकत असे. हा ढाबा चालक हे स्पिरिट दारू आणि हातभट्टी वाल्यांना विक्री करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. हि कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे आणि विभागीय भरारी उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी केली.