Categories: Previos News

आ.कुल यांच्या दिव्यांग मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, 600 पेक्षा जास्त दिव्यांगांनी घेतला लाभ



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त कै.सुभाषआण्णा कुल मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व उपजिल्हा रुग्णालय दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने आज बोरमलनाथ मंदीर, केडगाव- चौफुला येथे  दिव्यांग मेळावा तसेच अपंगत्व तपासणी व प्रमाणपत्र नोंदणी शिबीरास दौंड तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये अस्थिव्यंग, नेञव्यंग असलेल्या नागरिकांची तपासणी, अपंगत्व प्रमाणपत्र तसेच ST प्रवास सवलतीसाठी आवश्यक कार्ड नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. या शिबिराचा सुमारे ६०० हुन अधिक दिव्यांगांनी लाभ घेतला. 

गेले अनेक वर्षे आपण महाआरोग्य मेळाव्याच्या माध्यमातून दिव्यांगांना आवश्यक व्हील चेअर, क्लचेस , चष्मे, कॅलिपर्स, जयपुर फूट आदींचे मोफत वाटप तसेच विविध वैद्यकीय उपचारांसाठी मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे  येणाऱ्या काळात दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या विविध योजना, उपलब्ध सुविधा आणि सवलतींचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील राहून त्यांच्या विविध अडी अडचणी शासनदरबारी मांडण्याचे आश्वासन यावेळी दौंडचर आमदार राहुल कुल यांनी दिले. 

या मेळाव्यास भीमा पाटसचे मा.व्हाईस चेअरमन आनंद थोरात, व्हाइस चेअरमन नामदेव बारवकर, सौ. कांचन राहुल कुल (अध्यक्षा पुणे जिल्हा महिला मोर्चा भाजपा)  माऊली ताकवणे (दौंड तालुका अध्यक्ष भाजपा) गोरख दिवेकर (सरपंच वरवंड) धनाजी शेळके, शिवाजी दिवेकर, संजय दिवेकर, धर्मेंद्र सातव, संजय मोकल, बाळासो नानवर, अरुणराव आटोळे, लक्ष्मण रांधवण, जयदिप सोडनवर, सोमनाथ गडधे, विकास शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. 

तसेच यावेळी या मेळाव्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे, डॉ. शशिकांत ईरवाडकर, डॉ. पोळ मॅडम तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे श्री. मिसाळ साहेब, श्री. बाळासाहेब नानवर, दौंड ST आगाराचे श्री.मगर , डॉ. रोहन खवटे,  तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कर्मचारी आदींचे व उपस्थित सर्व सहकारी बांधवाचे आमदार कुल यांनी आभार मानले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago