दौंड शहरामध्ये पुन्हा ‛6’जण कोरोना पॉझिटिव्ह, लवकरच चैन ब्रेक झाली नाही तर ‛हा’ परिणाम होण्याची भीती



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड शहरामध्ये नुकतीच दोघांना कोरोनाची लागण झालेली असताना आज पुन्हा सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सहा जणांमध्ये काहीजण हे कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील असल्याचे यावेळी डॉ. डांगे यांनी सांगितले आहे.

दौंड शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने ही चैन ब्रेक करणे गरजेचे बनले आहे अन्यथा याचा मोठा परिणाम तेथील बाराजपेठ तसेच विविध प्रशासकीय कामांवर होण्याची भीती वर्तवली जात आहे. याबाबत नागरिकांनी मास्क वापरावे, साबनाने हाथ धुवावेत तसेच सॅनिटायझरचा योग्य वापर करण्याचे आवाहन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.