Categories: Previos News

दौंड : 6 जणांकडून कोयता, लोखंडी रॉडने ‛नानगाव’च्या तरुणावर जीवघेणा हल्ला, हल्ल्यात तरुण गंभीर जखमी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील नानगाव-पारगाव रोडवर दूध टाकायला निघालेल्या तरुणावर दबा धरून बसलेल्या सहा जणांनी कोयता, लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्यास केडगाव येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

ईश्वर केशव खळदकर (वय-३९ रा.नानगाव,डि.के.वस्ती, ता.दौंड जि.पुणे) असे या तरुणाचे नाव असून त्याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी सनी कोलते (रा.पिसावरे, ता.पुरंदर जि.पुणे) दत्तात्रय अशोक शिंदे (रा.राहू ता.दौंड) व इतर चार अनोळखी इसमांनी ईश्वर खळदकर हा गुरुवार दि.९ जुलै रोजी सकाळी सव्वा आठ वाजता पारगाव ता. दौंड येथे दूध घालायला जात असताना वरील ओळखीच्या दोन व त्यांच्यासोबत असणाऱ्या  चार इसमांनी रस्त्यावर येऊन त्यांची गाडी अडवली व सनी कोलते याने त्याच्या हातातील कोयत्याने ईश्वर खळदकर यांच्या डोक्यामध्ये घाव घातला यावेळी दत्ता शिंदे यानेही त्याच्या जवळील कोयत्याच्या उलट्या बाजूने हाताच्या कोपरावर, पायाचा पंजा, नडगीवर मारून तुला खल्लास करतो असे म्हणत हल्ला चढवला यावेळी त्यांच्या सोबत असणाऱ्या चौघांनीही ईश्वर खळदकर यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केले. ईश्वर खळदकर यांच्या फिर्यादीनुसार वरील सहा आरोपींवर यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यवतचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहा.पो निरीक्षक धनंजय कापरे, पो.हवा जितेंद्र पानसरे, पो.कॉ बाळासाहेब चोरामले, पो.कॉ विशाल जाधव हे करीत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago