दौंड शहरामध्ये पुन्हा 6 जण कोरोना पॉझिटिव्ह, मात्र तरीही दिलासादायक कसे ते वाचा सविस्तर



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड शहरामध्ये सध्या दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

प्रत्येकी शंभर स्वॅब मागे आता साधारणता 5-6 जण कोरोना रुग्ण आढळत असून काही दिवसांनी हा आकडा शून्यावर जाईल असा विश्वास प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

डॉ.संग्राम डांगे वैद्यकीयअधीक्षक    उपजिल्हा रुग्णालय दौंड यांच्यावतीने देण्यात आलेल्या अहवालानुसार 

उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 13 ऑगस्ट रोजी एकुण 105 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी प्राप्त झाले असून त्या

पैकी एकूण 6 व्यक्तीचे स्वॅब हे पॉझिटिव्ह आले आहेत तर 99 व्यक्तीचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.

पिझिटिव्ह मध्ये 6 पुरुषांचा समावेश असून ते एस आर पी एफ ग्रुप नं 5 चे 6 जण असल्याची माहिती डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. या सर्वांचे वयोगट हे 

 30 ते 54 वर्ष असे आहेत.