युवकाच्या खून प्रकरणी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखासह 6 जणांवर गुन्हा दाखल



पुणे : सहकारनामा

पुणे शहरातील येरवडा भागातून अचानक गायब झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात वातावरण तंग बनले आहे. या खून प्रकरणी हडपसर पोलिसांनी शिवसेनेच्या उप जिल्हा प्रमुखासह सहा जणांवर गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ माजली आहे. 

सुरेश राजू रेकुंठा असे खून झालेल्या या तरुणाचे नाव असून तो पुणे जिल्हा अखिल भारतीय सेनेचा  उपाध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी या खून प्रकरणी धनराज शंकर घुले, सुमित सुनील घुले, समद अन्सारी, धीरज शंकर घुले व वैभव विष्णू रणदिवे यांना अटक केली आहे तर शिवसेना उपजिल्हा प्रमुख शंकर घुले यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खून झालेला तरुण बेपत्ता झाल्यानंतर त्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती मात्र पोलिसांनी दिरंगाई केल्याने युवकाचा तपास लागला नाही आणि नंतर त्याचा मृतदेह हाती लागला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.