कुरकुंभ’मध्ये पुन्हा 6 कोरोना पॉझिटिव्ह तर या 2 गावांमध्येही रुग्ण वाढले



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे सर्वश्रुत आहे. कोरोनाच्या विळख्याने दौंडकरांची झोप उडवली आहे. नागरिक योग्य ती काळजी घेत नसल्याने दररोज कुठे न कुठे कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत त्यामुळे प्रशासकीय यंत्रणाही हतबल होऊ लागल्या आहेत.

दौंड तालुक्यातील कुरकुंभ, खडकी आणि देउळगाव राजे येथेही पुन्हा कोरोना रुग्ण सापडल्याने आता येथील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

कुरकुंभमध्ये तब्बल 6 जण, देऊळगाव राजे येथे 2, जण तर खडकी येथे 1 जण असे एकूण 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी दिली आहे. 

या कोरोना बाधित रुग्णांमध्ये 5 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश असून एक 6 वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे.