पुणे ग्रामीण पोलीस दलातील 6 पोलीस अंमलदारांची पोलीस उप निरीक्षकपदी निवड



लोणी काळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)

राज्य लोकसेवा आयोगातर्फे  घेण्यात आलेल्या खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहा पोलीस अंमलदार यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे.

दरम्यान  2017 मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी राज्यभरातून 4559 पोलीस उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1451 उमेदवार हे मैदानी चाचणी परीक्षेत पात्र झाले आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहा पोलीस अंमलदार यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे.

निवड झालेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे व कार्यरत असणारे पोलीस स्टेशन कंसामध्ये

उमाकांत गोपीनाथ कुंजीर (स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण), राहुल बाळासाहेब भागवत (शिरूर पोलीस स्टेशन),  सूर्यकांत राजाराम ओंबासे (वेल्हा पोलिस स्टेशन), शरद बिरजू लोहकरे (वडगाव मावळ महामार्ग पोलीस) अविनाश दराडे (बारामती पोलीस स्टेशन)  नाथा बबन गळवे ( बारामती पोलीस स्टेशन)  हे उत्तीर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. 



उप निरीक्षपदी निवड झाल्यानंतर 

उमाकांत कुंजीर यांनी आपली पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्यामुळे खूप आनंद झाला आहे. यापूर्वी तीन वेळा राज्यसेवा परीक्षा दिली होती तरीही यश मिळाले नाही. 

तरीही न खचता डगमगता नवीन उमेदीने चिकाटीने अथक परिश्रम केल्यानंतर यावेळी यश संपादन केले. या यशामध्ये कुटुंब,  मित्रमंडळी व सहकाऱ्यांची मोलाची साथ मिळाली असे मनोगत व्यक्त केले.