दौंड शहर आणि परिसरामध्ये 6 जणांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा

दौंड शहर आणि परिसरामध्ये असणाऱ्या ग्रामिण भागामध्ये आज पुन्हा 6 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी माहिती दिली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दौंड शहर 1, गोपाळवाडी 1, नानविज 1, पद्मावती नगर 1, दौंड शुगर 1 आणि कानगाव 1 असे 6 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण 40  रुग्णांची रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्यात आली होती त्या पैकी 6 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर 34 जण निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 3 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश असून 3 जण शहर भागातील तर 3 जण ग्रामिण भागातील रहिवासी आहेत.