मोबाईल 5G नेटवर्क विरोधात जूही चावला हायकोर्टात



|सहकारनामा|

नवी दिल्ली : देशात 5 जी (5G Network) वायरलेस नेटवर्क स्थापित करण्याविरोधात अभिनेत्री जूही चावला (Juhi Chawla) दिल्ली उच्च न्यायालयात 5G मोबाईल नेटवर्क विरोधात याचिका दाखल केली आहे.  

जुही चावलाच्या म्हणण्यानुसार  टेलिकॉम उद्योगाच्या (5G 5G Mobile Network) च्या योजना पूर्ण झाल्या तर पृथ्वीवरील व्यक्ती, प्राणी, पक्षी, कीटक आणि कोणतीही वनस्पती याच्या दुष्परिणामांपासून सुटू शकणार नाही.

हे प्रकरण न्यायमूर्ती सी हरीशंकर यांच्यासमोर उभे राहिले. त्यांनी आज 2 जून रोजी हे प्रकरण सुनावणीसाठी दुसर्‍या खंडपीठाकडे वर्ग केले आहे. जूही चावला (juhi chawla) म्हणन्यानुसार या 5G योजनांमुळे मानवांवर गंभीर, अपरिवर्तनीय परिणाम होण्याची आणि पृथ्वीवरील सर्व पर्यावरणातील कायमचे नुकसान होण्याचा धोका आहे.

अ‍ॅडव्होकेट दीपक खोसला यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत अधिकाऱ्यांना 5G तंत्रज्ञान हे मानवजातीसाठी, पुरुष, महिला, प्रौढ, बालक, अर्भक, प्राणी आणि सर्व प्रकारच्या जीव-जंतुंसाठी सुरक्षित आहे का हे स्पष्ट करण्यासाठी निर्देश मागितले आहे.