राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने दौंडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

दौंड : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने येथील सद्भावना सामाजिक सेवा प्रतिष्ठान व सद्भावना सामाजिक रिक्षा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने व सामाजिक कार्यकर्ते जॉन फिलिप अँथोनी यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन सेंट सेबेस्टियन हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर डेनिस जोसेफ व मा. उपनगराध्यक्ष फिलिप अँथोनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा. उपनगराध्यक्ष राजेश जाधव, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष फ्रान्सिस डॅनियल, चंद्रशेखर कल्पनूर,जेरी जोसेफ, आम आदमी पक्षाचे रवींद्र जाधव, रुपेश कटारिया, व्हिन्सेंट रंगन, कालू फिलिप, जेम्स स्वामी, साळुंखे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

55 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान करून शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संघटनेच्या वतीने रिक्षाचालक गणेश डोंगरे यास यावेळी औषधोपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली. गांधी जयंती निमित्त सद्भावना संघटनेच्या वतीने गेली 23 वर्ष अखंडपणे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. रोटरी क्लब ऑफ दौंड यांचे शिबिरास विशेष सहकार्य लाभले.