दौंड तालुक्यात आज पुन्हा 55 जणांना कोरोनाची लागण, ग्रामिण भागातील हि 13 गावे आहेत आघाडीवर



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यात आज पुन्हा 55 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.

आज दौंड तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये 13 गावांतील 24 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेखा पोळ मॅडम यांनी दिली असून दौंड शहरात 31 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली. 

आज दौंड शहर आणि दौंड ग्रामिण असे मिळून एकूण 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून ग्रामिण भागामध्ये केडगाव 2, मळद 3, गोपाळवाडी 3, कानगाव 3, लिंगाळी 5, कुरकुंभ 1, कासुर्डी 1, नाथाचीवाडी 1, पारगाव 1, नानविज 1, आलेगाव 1, वाळकी 1 आणि बोरीऐंदी 1 असे 24 रुग्ण आहेत.

तर आज दौंड उपजिल्हा रुग्णालयात एकूण 107 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली होती त्यापैकी 31 जनांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील 15 जण शहराच्या जवळ   असणाऱ्या ग्रामिण भागातील 14 तर एस आर पी एफ चे 2 रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये 22 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे.