दौंड ग्रामिण : 53 पैकी 10 जण पॉझिटिव्ह, केडगावच्या कोरोना रुग्णांत भर



दौंड : सहकारनामा ऑनलाईन 

यवत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने दि.26 सप्टेंबर रोजी 53 जणांचे स्वॅब पाठविण्यात आल्यानंतर 53 पैकी 10 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार केडगाव मध्ये (पत्रा कंपनी 2, चौफुला 2, आंबेगाव 1) असे एकूण 5 जण पॉझिटिव्ह आढळून आले तर यवत 1, देलवडी 2, तांबेवाडी 1, कोरेगाव भिवर 1 असे एकूण 10 जण कोरोना रुग्ण सापडले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 08 पुरुष आणि 02 महिलांचा समावेश असून सर्वांचे वय हे 22 ते 75 दरम्यान असल्याचे वैद्यकीय अधीक्षकांनी नमूद केले आहे.