दौंड तालुक्यातील रस्ते दुरुस्तीसाठी 52 कोटींचा निधी – आ.राहुल कुल

दौंड : दौंड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गाच्या दुरुस्ती व मजबुती करण्यासाठी सुमारे ५२ कोटी रुपयांचा निधी राज्याच्या जुलै २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पीय (पावसाळी) अधिवेशनात मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.

दौंड तालुक्यातील काही प्रमुख जिल्हा मार्गाच्या दुरुस्ती व मजबुती करणासाठी निधी मिळावा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानुसार प्रमुख जिल्हा मार्गाच्या दुरुस्ती व मजबुती करणासाठी सुमारे ५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यारत आला आहे.
निधी मंजूर करण्यात आलेले रस्ते पुढील प्रमाणे आहेत :

१) बोरीबेल दौंड शुगर रस्ता ते धुमाळवस्ती, आलेगाव ते कदमवस्ती ते हिंगणीबेर्डी, कदमवस्ती ते देऊळगाव राजे रस्त्याची सुधारणा करणे 21 कोटी

2) शिंदेनगर ते राहु शाळा रस्त्याची सुधारणा करणे 3 कोटी 50 लक्ष,

3) पडवी ते माळवाडी रस्त्याची सुधारणा करणे 4 कोटी,

4) बोरीऐदी ते डांळीब गावाजवळ पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे 3 कोटी 50 लक्ष,

5) पांढरेवाडी ते कुरकुंभ रस्त्याची सुधारणा करणे 2 कोटी 50 लक्ष,

6) सुर्वे वस्ती ते फडके वस्ती रस्त्याची सुधारणा करणे 5 कोटी,

7) भोसले चौक उंडवडी ते लडकतवाडी ते खुटबाव रस्त्याची सुधारणा करणे 5 कोटी,

8) मिरवडी ते दहिटणे पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे 1 कोटी 50 लक्ष,

9) कुरकुंभ ते कौठडी रस्त्याची सुधारणा करणे 2 कोटी,

10) नानवीज ते गार रस्त्याची सुधारणा करणे 2 कोटी,

11) गिरिम ते धनगरवस्ती गिरिम रस्त्याची सुधारणा करणे 2 कोटी अशा प्रकारे निधी मंजूर करण्यात आला आहे.

मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग पुणे यांचेमार्फत करण्यात येणार असून लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.