– सहकारनामा
दौंड : यवत ग्रामिण रुग्णालयाकडून कोविड 19 साठी दि 2 एप्रिल 2021 रोजी 163 जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते.
या 163 नमुन्यांपैकी 52 जण पॉझिटिव्ह आले तर 111 जण निगेटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशिकांत इरवाडकर यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 34 पुरुष आणि 18 महिलांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये केडगाव – 10, जावजी बुवाचीवाडी – 1, देलवडी – 1, बोरगाव – 1, यवत -11, देवकरवाडी – 1, पिलानवाडी – 1, पिंपळगाव – 1, दौंड -5, वाळकी – 1, वरवंड – 3, सुपा – 2, कासुर्डी – 1, खुटबाव – 2, भांडगाव – 1, पाटस – 1, भरतगाव – 5, राहू – 2, राजुरी – 1, तांबेवाडी – 1, अशी गाव निहाय आकडेवारी आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे वयोमान हे 11 ते 73 वर्षांदरम्यान आहे.