Categories: Previos News

यवत पोलीस आणि दौंड महसूल पथकाकडून वाळू माफियांवर संयुक्त कारवाई, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त



दौंड : सहकारनामा 

आज गुरुवार दि. 25/2/2021 रोजी दौंड तालुक्यामध्ये अवैध वाळू उत्खनन व वाळु  वाहतुकीची तस्करी रोखण्यासाठी मा.जिल्हाधिकारी पुणे तसेच मा. पोलीस  अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख  यांच्या आदेशान्वये दौंडचे तहसीलदार यांनी पोलिस व महसूल यांचे संयुक्त पथक तयार करून कासुर्डी टोल नाक्यावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाई केली करत सुमारे 50 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



गुरुवारी सकाळी कारवाई करत असताना पोलीस व महसूल पथकाने वाहनांना थांबवण्याचा इशारा केला असता काही वाहने पुणे बाजूकडे भरधाव वेगात निघून गेल्याने वरील पथकाने कासुर्डी टोल नाका ते हाॅटेल सिंधू पंजाबी सहजपूर समोरील हायवे रोड येथून MH 42 AQ 0009 यावरील चालक मनोज झुंबर केदारी ( वय 30 वर्ष राहणार येसवडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर) याच्याकडील भारत बेंज कंपनीचा दहा टायर हायवा  व त्यात अंदाजे आठ ब्रास वाळू व  28 लाखाचा हायवा जप्त केला.

 तर अशीच कारवाई  MH 42 AQ 0001 यावरील चालक दादा विठ्ठल अवचट (वय 40 वर्ष राहणार देऊळगाव राजे तालुका दौंड जिल्हा पुणे)  याच्याकडील भारत बेंज कंपनीचा 6 टायर हायवा त्यामध्ये अंदाजे पाच ब्रास वाळू व 16 लाखाचा हायवा तसेच  टाटा कंपनीचा  MH 12 CT 9942 यावरील चालक शरद रामभाऊ  ठाणगे (वय 30 रा. पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर) या तीन वाहन चालक आणि वाहनांवर केली आहे.

या तीन वेगवेगळ्या वाहनांमध्ये अंदाजे 17 ब्रास अवैध वाळू किंमत अंदाजे 1,02,000/- तसेच वाहनांची किंमत अंदाजे 49 लाख रुपये असा मुद्देमाल दौंड तहसीलदार संजय पाटील व पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या पथकाने जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोईटे, पोलीस नाईक रणजीत निकम , दशरथ बनसोडे, संतोष पंडित ,संपत खबाले ,सुजित जगताप , विजय आवाळे तसेच मंडलाधिकारी जाधव, तलाठी जाधव इंदोळे यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केली आहे.

या कारवाईत 50,02000/- ( 50 लाख दोन हजार रुपये ) रुपयांचा मुद्देमाल पुढील कारवाईसाठी तहसीलदार यांनी ताब्यात घेतला आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

6 तास ago

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

18 तास ago

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

1 दिवस ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

2 दिवस ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

3 दिवस ago