Categories: Previos News

थेऊरच्या दोन उद्योजकांकडून 500 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि प्रत्येकी 1 हजार रुपयांची रोख मदत

थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)

वैश्विक महामारी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चालू असलेल्या लाॅकडाऊनच्या काळात अनेकजण अडचणीत सापडले आहेत त्यात अनेक समाजसेवी संस्था तसेच व्यक्तींनी मदतीचे हात पुढे केले आहेत. बरेचजण शिधा सामुग्रीचे वाटप करीत आहेत. परंतु दैनंदिन जीवनात काही गोष्टी विकत घेण्यासाठी रोख रकमेचीही आवश्यकता असते. अशावेळी हीच अडचण विचारात घेऊन थेऊर येथील उद्योजक खंडू गावडे व गणेश गावडे यांनी गावातील गरजू व मजुरी करणाऱ्या कुटूंबांना जीवनावश्यक वस्तुचे एक कीट रोख एक हजार रुपये रोख अशी भरघोस मदत केली आहे. 

समाजातील बांधव अडचणीत सापडल्यावर त्यांना मदतीचा हात देण्याची आपली संस्कृती आहे याचाच प्रत्येय या वैश्विक महामारीच्या काळात दिसून येत आहे. तयार जेवनापासून ते कोरडा शिधा घरपोच दिला जात आहे. नोकरी अथवा रोजगार नसल्याने अनेकांना आर्थिक चणचण जाणवू लागली आहे. दवाखाना औषधी लहान मुलांना दुध आणण्यासाठी रोख पैशाची आवश्यकता असते हीच अडचण ओळखून कुटुबातील  एक सदस्य या नात्याने माजी उपसरपंच सुदाम गावडे यांच्या प्रेरणेने खंडू गावडे व गणेश गावडे यांनी थेऊर येथील पाचशे कुटूंबाला जीवनावश्यक वस्तुचे एक कीट व रोख एक हजार रुपयाची आर्थिक मदत केली आहे. या मदतीमुळे या गरजूंना मोठा दिलासा मिळाला आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago